पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने पतीसह आठ जणांवर पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे येथील इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब यांच्याशी नगरदेवळा येथील माहेर असलेल्या खैरुनिसाबी शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब हिचा विवाह २७ डिसेंबर २०१८ रोजी झाला. विवाहानंतर सासरची मंडळी सुरवातीला ८ ते १० दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर तिला त्रास दिऊ लागले. विवाहितेस मुलगा होत नाही, तसेच झालेल्या मुलीच्या बाळांतपणासाठी लागलेला ५० हजार रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब (पती), शेख अयुब शेख सरदार (सासरे), कुर्शादबी शेख अयुब (सासु), इसा शेख अयुब (जेठ), नफिसाबी शेख इस्माईल (जेठाणी), जरीनाबी शेख अयुब (ननंद) व जमिलाबी शेख अयुब रा. सर्व बोरखेडा (पिराचे) ता. चाळीसगाव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद पाटील हे करत आहे.