जळगाव : शहरातील नवल कॉलनीतील जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला असून ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय म्हणून नोकरीला आहे. त्यांची पत्नी व मुले माहेरी गेले आहे. जतीन चांगरे ही घरी एकटे असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी घरी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोउला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीनने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.