नेत्यांची राज्याच्या विभागनिहाय निवडणूक प्रभारी पदी नेमणूक
मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहु लागले आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 5 वरिष्ठ नेत्यांची राज्याच्या विभागनिहाय निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.
कॉंग्रेस महासचिव वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीने महाराष्ट्र विधानसभा नवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी प्रस्तावाला मंजूरी दिली. कॉंग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची विदर्भ विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांची मुंबई विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. पक्षाचे वरिष्ठ नेते रजनी पाटिल यांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली. आरसी खुनटिया यांची उत्तर महाराष्ट्र विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांची मराठवाडा विभागाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली.