उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड
भुसावळ:- जळगांव जिल्ह्याचे विविध आंदोलनाच्या माध्यमातून समाजी कार्य करणारे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया{ए}मध्ये आपल्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला . यामुळे जिल्ह्यात रिपाईची ताकद वाढणार असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मत व्यक्त केले . याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना होणार आहे.
भुसावळ येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष .राजुभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात मुकुंद सपकाळे यांनी पाश प्रवेश केला . यांयावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष .रमेशजी मकासरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,उ.म.संपर्क प्रमुख म.अनिलभाई गांगुर्डे ,प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण जाधव ,लोकसभा क्षेत्र अध्यक्ष तथा नगर सेवक आनंद खरात, युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश सोहळा होऊन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मुकुंद भाऊ सपकाळे यांनी निवड करण्यात आली आहे.भावी वाटचालीस जळगाव जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे.विधानसभा अध्यक्ष अशोक जी बोरेकर,भड़गांव तालुकाध्यक्ष अण्णा खेडकर, युवा नेते पप्पू सुरडकर,बाळू सोनवणे,प्रकाश सोनवणे यांच्या सहित जिल्ह्यातील पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या .