मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे देशात महागाई अजून वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. यापूर्वी सोमवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे दोन दिवस इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार जळगावात पेट्रोल प्रति लिटर ११३ रुपयांवर गेले आहे. तर डिझेल १०१ रुपयांवर गेले आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.














