बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ने ११ जुलै २०२१ रोजी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. ज्यासाठी उमेदवार १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. आता आयबीपीएसने पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या भरतीद्वारे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पैकी रिक्त पदे भरली जातील.
या पदांसाठी भरती
लिपिक (Clerk) – एकूण जागा 5830+
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
लिपिक (Clerk) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसच उमेदवाराकडे वैध मार्क-शीट असणं आवश्यक आहेतसंच उमेदवारांनी गुणांची टक्केवारी जाहीर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र/डिप्लोमा/संगणक ऑपरेशन्स/भाषा/पदवी/संगणक याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
लिपिक (Clerk) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये
SC/ST/PWD/Ex-Serviceman – 175/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021