जळगाव – येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभागात अव्वल कारकून पदावर सेवेत असलेले योगेश नन्नवरे यांची नुकतीच जळगाव मंडळ अधिकारी पदावर बदली झाल्याचे आदेश वरीष्ठ कार्यालया कडून प्राप्त झाले आहे.
योगेश नन्नवरे हे गेल्या साडे तीन वर्षा पासून जळगांव तहसील कार्यालय येथे पुरवठा विभागात अव्वल कारकून या पदावर कार्यरत होते.प्रशासकीय नियमित बदली मुळे त्यांची जळगाव मंडळ अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
साडेतीन वर्षात सर्वाधिक रेशन कार्ड कॅम्प
पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून पदावर योगेश नन्नवरे यांनी पदभार स्विकारल्या पासून जळगाव शहर व तालुक्यातील गोर गरीब, गरजूनां हक्काचे धान्य मिळावे या करिता शासन आपल्या दारी योजनेतून विविध सामाजिक संस्थाना सोबत घेऊन तहसील यांच्या मार्गदर्शनाने रेशन कार्ड कॅम्प राबवून हजारो गरजू लाभार्थी वर्गाला लाभ मिळवून दिला आहे.
पुरवठा विभागात कामे होत नसल्याची प्रतिमा पुसण्यात योगेश नन्नवरे यांना यश…
रेशनकार्ड साठी सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात… कर्मचारी जागेवर राहत नाही ही प्रतिमा श्री. नन्नवरे यांनी पुरवठा विभागात पदभार स्विकारल्यावर पुसली गेली आहे.
जळगाव तहसील पुरवठा विभागावर जळगांव शहर व तालुक्याचा मोठा भार असतांना देखील अतिशय खेळाडूवृत्तीने श्री. नन्नवरे यांनी काम केल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यां कडून त्यांचे अनेकदा कौतुक करण्यात आले आहे.
Congratulations for the new pramotion posting…