मुंबई : सणासुदीपूर्वीच सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका लागला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. विना अनुदानीत १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ केली.
आधीच देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असता त्यात आता सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीला इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५ रूपयांची वाढ केली होती. यादरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु आज गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली.
तुमच्या शहरात काय आहे घरगुती गॅसचा आताचा दर –
– जळगावात 14.2 किलोग्रॅम सिलेंडर 904.50 रुपये
– दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडर 899.50 रुपये
– कोलकातामध्ये घरगुती सिलेंडरचा भाव 911 रुपयांवरुन 926 रुपये झाला आहे.
– मुंबईत गॅस सिलेंडर 844.50 रुपयांनी वाढून 899.50 रुपये इतका झाला.
– चेन्नईत सिलेंडर दर 900.50 रुपयांवरुन 915.50 रुपये झाला.
याच वर्षी जानेवारी महिन्यात १ जानेवारी रोजी गॅस सिलिंडरचे दर ६९४ रूपये होते. परंतु १ सप्टेंबर रोजी हे दर वाढून ८८४ रूपये झाले. १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.