Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जे गेलेत त्यांची काळजी नको, सरकार आपलेच येणार-पवार

najarkaid live by najarkaid live
September 16, 2019
in राज्य
0
जे गेलेत त्यांची काळजी नको, सरकार आपलेच येणार-पवार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक-जे गेले त्यांची काळजी करू नका, असे सांगतानाच सरकारविरुद्ध जनमत आहे आणि सरकार आपलेच येणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय बैठकांना सुरुवात झाली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत मतप्रदर्शन केलं.
आता फक्त निवडणूक हे लक्ष्य असल्याचं सांगत याच आठवड्यात निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करेल, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत. त्यांचा नाशिक दौरा झाल्यावर निवडणुका जाहीर होतील, असे वाटते असेही पवार पुढे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढणार आहे आणि उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत, असेही पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानीचे राजू शेट्टी तसेच जोगेंद्र कवाडेंचा पक्ष व डावे पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवतील व आघाडीचा प्रचार संयुक्तपणे करण्याचा आमचा विचार असल्याचेही पवार म्हणाले.
ईडीची नोटीस दाखवून धमकी!
ईडीची नोटीस दाखवून माझ्या काही सहकाऱ्यांना धमकी देण्यात आली. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर मला काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला. माझी आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. निवडणुकीवर बहिष्कार टाका, ही त्यांची भूमिका होती. मात्र, त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही, असे पवार म्हणाले. झेंड्याबाबत अजित पवार यांचं मत वैयक्तिक आहे, पक्षाचं नाही. पक्षाचा झेंडा बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानबद्दल काहीही बोललो नाही!
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे. आपल्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला? याचा विचार त्यांनी करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे, असे पवार म्हणाले. मी पाकिस्तानबद्दल काहीही बोललो नाही. मित्रांशी बोलताना मी माझा अनुभव सांगितला. आपला क्रिकेट संघ पाकिस्तानात गेला तेव्हाचा तो अनुभव होता. आपल्या फलंदाजांनी धावा केल्यावर तेथील प्रेक्षक त्याचं स्वागत करत होते, असं मी म्हणालो होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वयंप्रेरणेतून स्वअध्ययन करणे गरजेचे – डॉ.जयंत नारळीकर

Next Post

फारूख अब्दुल्ला ‘पीएसए’ कायद्यांतर्गत ताब्यात

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
फारूख अब्दुल्ला ‘पीएसए’ कायद्यांतर्गत ताब्यात

फारूख अब्दुल्ला 'पीएसए' कायद्यांतर्गत ताब्यात

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us