जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी ६ च्या सुमारास एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत असे की, आज सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅट फार्म क्रमांक ५ वर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी पंचनामा केला असता अनोळखी असल्याचे सांगण्यात आले. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे.
तरूणाची दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. अंगावर निळ्या फिक्कट रंगाची जिन्स पॅन्ट, दाढी मिशी वाढलेली असे मयत तरूणाचे वर्णन आहे. ओळख पटल्यास जळगाव रेल्वे पोलीसांशी संपर्क करावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.