नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंट वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आरबीआयने (RBI) सर्व बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.
आरबीआयने ट्वीट करून म्हटले आहे की, केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फसवणूक करणारे यासाठी नवीन पद्धती अवलंबत आहेत. तुम्ही तुमचे कार्ड अत्यंत काळजीपूर्वक वापरा. एटीएम / डेबिट कार्डची माहिती कोणाशीही शेअर करू नका, असे आरबीआय म्हणणे आहे.
जाणून घ्या आरबीआय काय म्हणते?
आरबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहकांना कॉल, एसएमएस आणि ईमेल पाठवून वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले जात आहे. यामध्ये लॉगिन, कार्ड, पिन (PIN)आणि ओटीपी (OTP) यासंबंधी माहिती मागितली जाते. बँक ग्राहकांना लिंक पाठवून केवायसी अपडेट करण्यासाठी unauthorised किंवा unverified अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकते.
KYC अपडेट न केल्यास ब्लॉक होईल अकाउंट
एसएमएस आणि ईमेल पाठवून ग्राहकांना सांगितले जात आहे की, जर त्यांनी केवायसी अपडेट केले नाही तर त्यांचे अकाउंट ब्लॉक किंवा बंद केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत जर ग्राहकाने कॉल, मेसेज किंवा बेकायदेशीर अॅपवर त्याची माहिती शेअर केली तर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळेल आणि ते ग्राहकाची फसवणूक करू शकतील.
अकाउंट ब्लॉक होण्याबाबत आरबीआय काय म्हणते?
आरबीआयचे म्हणणे आहे की, नियमन केलेल्या संस्थांना वेळोवेळी केवायसी अपडेट करावे लागते, परंतु ही प्रक्रिया सोपी केली गेली आहे. जर एखाद्या ग्राहकाच्या अकाउंटचे नियतकालिक अद्ययावत करायचे असेल तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये केवळ या कारणामुळे कोणतीही कारवाई केली जाणार नाही की, कोणत्याही नियामक/अंमलबजावणी एजन्सी/न्यायालयाच्या निर्देशानुसार असे करणे आवश्यक नाही.