टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन अर्थात धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनच्या काडीमोडचे वृत्त समोर येत आहे. शिखरची धवनची पत्नी आयेशा मुखर्जीचीच्या पोस्ट वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटस्फोट झाल्याचे वृत्त आहे.
नऊ वर्षापूर्वी शिखर धवन आणि आयशा मुखर्जी विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर आहे. शिखरपेक्षा दहा वर्षाने आयशा मोठी आहे. शिखर धवनशी आयशाचा हा दुसरा विवाह होता.
पहिल्या पतीपासून आयशाला दोन मुली आहेत. त्यानंतर २०१४ साली आयशाने झोरावरला जन्म दिला. शिखर आणि आयशाच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या गेल्या वर्षीचं समोर आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले.