जळगाव – माझ्याशी माझ्या परिवारावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असून याच्या निषेधार्थ आज सेवानिवृत्त सहाय्य्क फौजदाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी येथे घडल्याने पोलिसांची एकाच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
याबाबत माहिती अशी कि , भुसावळ येथे राहणारे सेवानिवृत्त सहाय्य्क फौजदार शेख शकील शेख दगू यांनी निवेदनाद्वारे आरोप केला कि, मी सेवानिवृत्त झाल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असून फौजपूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आणि फैजपूरचे पीएसआय जिजाबराव पाटील यांनी आपणास मानसिक त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून जेमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्यावर काही गुंडांनी प्राणघातक हल्ला करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असताना पोलिसांनी त्यांना अटक केली नसून उलट डीवायएसपी पिंगळे यांनी हातमिळवणी करून माझ्याशी माझ्या परिवारावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता . संबंधितांची सीबीआय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.