चाळीसगाव – शासकीय ,निमशासकीय कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 9 रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला . राज्यातील 10 लाख कर्मचारी आज संपात सहभागी झाले.
1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे , सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटि दूर कराव्या, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे भरावी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे , अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी , आरोग्यसेवेचा खासगीकरण बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला होता . संपात जिल्हाध्यक्ष गोविंद ठाकरे,कार्याध्यक्ष संदीप पाटील,उपाध्यक्ष दीपक गिरासे , कोषाध्यक्ष संदीप पवार , तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुका कार्याध्यक्ष रुपेश पाटील, अजय आवारे, सुमित ब्राह्मणकर, हेमंत मोरे,गोपाळ पाटील,सचिन बोरसे,राहुल अमृतकर, सुधीर पाटील, प्रशांत महाजन यांच्यासह असंख्य कर्मचार्यांनी संपात आपला सहभाग नोंदविला.