नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच, भारतातील कोरोना संकट पुन्हा वाढताना दिसत आहे.आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ताजी आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४७, ०९२ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यापूर्वी काल बुधवारी हा एकदा ४१,९६५ इतका होता.
याचबरोबर, गेल्या 24 तासांत 509 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 35,181 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्येत एकूण 11,402 ने वाढ झाली आहे.
केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्या अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 32,803 नवे कोरोना बाधित आढळून आले. तर संक्रमणामुळे आणखी 173 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांनंतर येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 90 हजार 36 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 20,961 वर पोहोचला आहे.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 529 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 89 हजार 583 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.