जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सकाळपासून बंद राहणार आहे.
मानराज मोटर्स समोरील १५०० मीमी जलवाहिनीवरील गळतीचे काम आज १ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आले आहे. तसेच वाघुर ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामाकरिता वाघुर पंपिंग स्टेशनला होणारा वीज पुरवठा २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बंद राहणार आहे. याकारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यानुसार २ सप्टेंबरचा पाणीपुरवठा ३ जुलै रोजी करण्यात येईल तसेच ३ व ४ रोजी पाणीपुरवठा अनुक्रमे ४ व ५ रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे.