अफगाणिस्तान – तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथल्या नागरिकांवर दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तालीबानी रोज काहीना काही दहशत पसरविणाऱ्या कृत्या करत आहे. त्यातच आज तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.
तालिबानने अमेरिकेला मदत करण्याच्या संशयवरून एकाला अत्यंत भयंकर शिक्षा दिली असून तालिबान्यांनी आधी त्या नागरिकाची हत्या केली व यानंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवून गावंभर फिरवला आहे.या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या घटनेमुळे जगभरातून तालीबानीवर टीका होतं आहे.