जळगाव प्रतिनिधी । जळगावात सात वर्षाच्या चिमुकलीवर एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत असे की, पीडित चिमुकली आपल्या आई, वडील आणि भावासोबत शहरातील एका भागात राहते. दरम्यान, त्यांच्या घराच्या समोर १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या आत्याकडे राहतो. त्या मुलाच्या आत्याने ससे पाळलेले असल्यामुळे त्यांना पाला घालण्यास पीडित मुलगी येत असे.
दरम्यान, काल रविवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १३ वर्षीय मुलाने ७ वर्षीय चिमुकलीला घराच्या छतावर घेवून जावून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आला. त्याने १३ वर्षीय मुलाला शिवीगाळ केली. दरम्यान, पिडीत मुलीचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. वडीलांना चिमुकलीला विश्वासात घेवून घडलेला प्रकार ऐकुण घेतला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांना रविवारी रात्री शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेतले आहे.