मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग मध्ये आहेत. जन आशीर्वाद यात्रेत जनतेशी संवाद साधत असताना राणेंना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. यावेळी राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.
संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली. नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. राणे हे आज सिंधुदुर्ग येथे आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. राजनाथ सिंहांनी तब्येत बरी आहे का विचारल्यावर राणे म्हणाले, “सर मेरी तबियत अच्छी हैं… हॉस्पिटल में नहीं था… घर पर ही था…. तबियत बिगडी है ऐसी उन्होंने हवा कर दी”… यावर राजनाथ सिहांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसंच उर्वरित यात्रेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. सरतेशेवटी राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.