मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात काल ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. त्यात आता ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
आता एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण, ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात ईडी चार्जशीट दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार आहे.