महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या मॅन्ग्रोव्ह्ज फाऊंडेशनमध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले अर्ज hr.mangrovefn@gmail.com वर दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://mangroves.maharashtra.gov.in/ वर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे. भरती संदर्भातील अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
या पदांसाठी होणार भरती?
१) सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन
२) सहाय्यक संचालक फायनान्स
३) सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट
४) रिसर्च ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन: या पदासाठी उमेदवाराकडे एचआरमध्ये एमबीए किंवा अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. एचआर किंवा संबंधित या क्षेत्राचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ५० हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे.
सहाय्यक संचालक फायनान्स : या पदासाठी उमेदवाराकडे सीए/ सीए (इंटर)/ ३ वर्षांच्या CA अनुभवासोबत एमकॉम/ सीए (इंटर) आणि ५ वर्षांचा एमकॉम ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. या पदासाठी पात्र उमेदवारास ५० हजार दरमहा पगार मिळणार आहे.
सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट : पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे फिशरीस आणि अॅक्वाकल्चर संबधी क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची समज आणि संवाद साधता येणं तसेच संबंधित क्षेत्राचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ५० हजार रुपये पगार मिळणार आहे.
रिसर्च ऑफिस : पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बायोलॉजिकल सायन्समध्ये किमान ६० टक्के गुणासह पोस्ट ग्रॅज्युएशन, बायोलॉजिकल क्षेत्राचा २ वर्षांचा अनुभव, इंग्रजी, मराठी भाषा लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३५ हजार रुपये दरमहा पगार देण्यात येणार आहे.
मॅन्ग्रोव्ह्ज अॅण्ड मरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाऊंडेशन महाराष्ट्र (Mangrove Foundation) अंतर्गत मुंबईत १ वर्षाच्या कालावधीसाठी चार पदांवर भरती होणार आहे. उमेदवाराची गुणवत्ता पाहून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
जाहिरात (Notification)
१) सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन : PDF
२) सहाय्यक संचालक फायनान्स : PDF
३) सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट : PDF
४) रिसर्च ऑफिसर : PDF