पाचोरा ( प्रतिनिधी )- येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ( इस्काॅन ) तर्फे दि . १ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ ते ९ दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन शहरातील व्यंकटगोपाल मंगल कार्यालय , जारगांव चौफुली येथे केले आहे.
ह्या उत्सवात भगवान श्री कृष्ण जन्म कथा, भजन,हरिनाम संकिर्तन ,महाअभिषेक ,श्रृंगार दर्शन , नाटिका, नृत्य ,५६ भोग, महाआरती सोबत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
कथेसाठी पंढरपुरहून श्रीमान श्रवणभक्ती दास प्रभुजी येणार आहेत . तसेच सदर कार्यक्रमाला बीड येथील इस्काॅन मंदीराचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद दास प्रभुजी हे उपस्थीत राहणार आहे.
तरी सर्वांनी ह्या महोत्सवाचा लाभ घ्यावा व आपले जीवन धन्य बनवावे अशी विनंती इस्काॅन पाचोरा तर्फे करण्यात आले आहे.