Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

najarkaid live by najarkaid live
June 13, 2021
in Uncategorized
0
भडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दि. 7 जून 2021 सोमवार रोजी महावितरण विरोधात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात तालाठोको-हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनानंतर पाचोरा येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि आ.किशोर पाटील यांच्या काही निकटवर्तीयांनी भडगाव महावितरण कार्यालयात जाऊन तोडफोड करत येथील उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे व त्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. या मारहाणीत तंत्रज्ञ कै.गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेतील एकूण 7 आरोपींपैकी 6 आरोपींना पकडण्यात भडगाव पोलिसांना यश आले असून त्यामध्ये क्रमांक 1) पाचोरा युवा सेनेचे शहराध्यक्ष-संदीप रामदास पाटील,रा.कोंडवाडा गल्ली पाचोरा 2) पाचोरा युवा सेनेचे माजी शहराध्यक्ष-जितेंद्र विश्वास पेंढारकर,रा.पुनगाव रोड पाचोरा 3) पुनगाव ग्रां.प.सदस्य अनिल (टिल्लू) बारकू पाटील,रा पुनगाव 4) सुमित रवींद्र सावंत रा.देशमुखवाडी पाचोरा 5) चरणसिंग प्रेमसिंग पाटील रा.वडगाव (सतीचे) ता.भडगाव 6) गणेश सुदाम चौधरी, रा.श्रीराम चौक,पाचोरा यांना दिनांक 12 जून 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.

या बाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अटक झालेल्या सर्व आरोपींनी आखलेला हा कट पूर्वनियोजित होता, अटक करण्यात आलेले आरोपी पाचोरा येथील आंदोलनात आमदार महोदयांसमवेत हजर असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे. तद्नंतर आंदोलन संपल्यावर सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी आप-आपल्या जागी कामासाठी पोहोचले असल्याचे कळताच आरोपींनी भडगांव गाठले व अंत्यत नियोजन बध्द पध्दतीने हा गंभीर गुन्हा केला.
ताला-ठोक आंदोलन कर्त्यांवर गुन्हा दाखल होवु नये याबाबत जशी काळजी घेण्यात आली होती, तशी काळजी भडगांव हल्ला प्रकरणी कोणतरी सुत्रधारांने घेतली होती, अटकेत असलेले सर्व आरोपी आमदार किशोर पाटील यांचे विश्वासातले व जवळचे लोक आहेत विशेष म्हणजे आरोपी शिवसैनीक असुन ते शिवसेना युवासेना चे आजी माजी पदाधिकारी, आमदाराचे निकटवर्तीय आर्थिक लाभार्थी आहेत. घटनेतील सर्व आरोपी पाचोरा येथील आंदोलनाच्या वेळी आमदाराचा सोबत उपस्थीत दिसतात, त्या नंतर त्यांचे भडगांव येथील महावितरण कार्यालयात जाण्याचे प्रयोजन काय ? ते भडगांव चे रहिवाशी नाहीत. आरोपी भडगांवचे शेतकरी किंवा विज ग्राहक आहेत का ? हल्ला करतांना सर्व आरोपींनी तोंडाला मास्क लावुन चेहरा लपवण्याचे प्रयोजन काय ? गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकलींचे नंबर प्लेट झाकणे व बदलणे यांचे काय कारण ? घटनास्थळी गेल्यावर कोणाच्या ईशाऱ्यावरुन त्यांनी विशिष्ठ अधिकाऱ्याचे नांव विचारले ? श्री. धामोरे यांना लक्ष्य करुन त्यावर जिवघेणा हल्ला का केला ? या हल्ल्यात अडसर ठरलेले निष्पाप गजानन राणे यांच्या मृत्युला आरोपी सोबतच सुत्रधार जबाबदार नाही का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार किशोर पाटील यांनी देणे गरजेचे आहे.

हे सर्व कृत्य सदर आरोपींनी कोणीतरी सुत्रधाराच्या सांगण्यावरून केले आहे,या संपुर्ण घटनेचा मुख्य सुत्रधार शोधुन त्याला तात्काळ अटक करावी. अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी दि.07 रोजी प्रत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत केली होती, तसे वृत्त प्रसिध्द झाले होते,आमदारांची तीच मागणी अमोल शिंदे यांनी या प्रत्रकार परिषदेत केली.

कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचा निष्पाप बळी आरोपींनी घेतला असून त्यांच्या या कृत्यामुळे आजच त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे.घटनेच्या मुख्य सुत्रधाराच्या या कृत्यामुळे राज्यभरात पाचोरा व भडगाव तालुक्याची प्रतिमा मलीन झाली असून शिवसेनेच्या वाढत्या गुंडगिरी मुळे पाचोरा व भडगाव तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.आणि या दहशतीने जनतादेखील भयभीत झालेले आहे.तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यास अटक झाल्यावरच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला व जखमी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खरा न्याय मिळेल.व मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शासनस्तरावरुन 50 लाखांची आर्थिक मद्दत व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महावितरणांत तात्काळ नोकरी देण्यात यावी.

त्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव त्यांच्या सोबत असून गरज पडल्यास रस्त्यावर देखील उतरेल असे भाजपाचे अमोल शिंदे यांनी सांगितले.या प्रसंगी भडगांव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील पाचोरा शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार,दिपक माने,आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी-बारावी पास असणाऱ्यांना संधी ; भारतीय तटरक्षक दलात ३५० रिक्त पदांची भरती

Next Post

विवरे येथे डेंगू रोगाची जनजागृती

Related Posts

लाडकी बहीण योजनेत E-KYC अपडेट: पूरग्रस्त भागासाठी

लाडकी बहीण योजनेत E-KYC अपडेट: पूरग्रस्त भागासाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत

October 14, 2025
राजगीर ASI सुमन तिर्की आत्महत्या: कौटुंबिक वादामुळे शोकाचे वातावरण

ICSI Recruitment 2025: Ministry of Corporate Affairs मध्ये 145 पदांसाठी थेट भरती, परीक्षा नाही!

Kolhapur Forex Trading Scam : दीड महिन्यात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष! हुपरीतील राजेंद्र नेर्लीकरची 12.35 कोटींची फसवणूक उघडकीस

Central Bank of India Recruitment 2025 – 7वी ते Graduate उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!”

“Central Bank of India Recruitment 2025 – 7वी ते Graduate उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!”

October 14, 2025
Cyber Fraud Alert: दोन वृद्धांना 7 कोटींचा Online Scam! सायबर भामट्यांनी लुटली आयुष्यभराची कमाई.

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us