गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी देण्यात येणारं ‘रेमडीसीवीर’ इंजेक्शन remdesivir injection चा मोठा तुटवडा होतं होता. भारतात तयार होणाऱ्या या ‘रेमडीसीवीर’ इंजेक्शन remdesivir injection ची भारताबाहेर निर्यात होतं असल्याने इथल्या रुग्णांना ‘रेमडीसीवीर’ उपलब्ध होणं अवघड होतं. देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता व या इंजेक्शनची मागणी पाहता केंद्र सरकारनं ‘रेमडीसीवीर’ remdesivir injection परदेश निर्यात थांबाविल्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान केंद्र सरकाने ‘रेमडीसीवीर’ निर्यात थांबवली म्हणून या हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
‘रेमडीसीवीर इंजेक्शन’ remdesivir injection तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ‘रेमडीसीवीर’ remdesivir injection उत्पादकांची बैठक घेतली होती.त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली होती. आज केंद्र शासनाने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.