कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर अथवा मुंबई पुरता निर्णय घेतले जातं होते आता तसे न करता संपूर्ण राज्या करिता एकच निर्णय राहील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या बैठकीत होईल असं सांगण्यात आलं आहे.
यावेळी बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर करण्यात येईल असं अजित पवार यांनी सांगितलं.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून यावेळी महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं.