Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा

पाचोरा येथे व्यापारी बैठकीत खासदार उन्मेश पाटील यांचा शासनाला इशारा

najarkaid by najarkaid
April 8, 2021
in जळगाव
0
लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- लॉकडाऊन मुळे लहान मोठे व्यापारी, कामगार, उद्योजक संकटात आले आहेत. व्यापार करतांना घेतलेले कर्ज डोक्यावर असून कामगार देखील आर्थिक संकटात आहेत. आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची चिंता सर्वसामान्य जनतेला असताना शासनाने लॉक डाऊन घोषित केल्याने जनता हवालदिल झाली आहे. आधीच शनिवारी आणि रविवारी केलेल्या लॉकडाऊनला व्यापारी जनता यांचा पाठींबा आहे.

मात्र सरसकट लॉकडाऊनला व्यापारी जनता कष्टकरी कामगार यांचा स्पष्ट विरोध असून कुठल्याही परिस्थितीत या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शासनाला दिला आहे. आज पाचोरा येथील कापड, सराफ, रेडिमेड कपडे, ऑटोमोबाईल, वाहन दुरूस्ती गॅरेज हार्डवेअर सिमेंट स्टील व्यापारी, बुट चप्पल, इलेक्ट्रिक जनरल स्टोअर्स व्यापारी आदींची बैठक आज पाचोरा बाजार समितीच्या समोरील अटल जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश दादा पाटील तर कापड रेडिमेड कपडे असोशीएशन अध्यक्ष प्रदीपकुमार संचेती, तालुका किराणा असोशिएशन अध्यक्ष जगदीश पटवारी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भडगाव तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील , तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, रविद्र पाटील, सराफा व्यावसायीक राजेश संचेती आदि मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यापाऱ्यांची भावना समजून घेतली. यावेळी सुनिल सराफ, नगरसेवक मनीष भोसले, राजेश संचेती, जगदीश पटवारी, प्रदीप कुमार संचेती यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आम्हाला जाचक अटींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे सांगीतले. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी लागलीच फोनवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेशी बोलून लॉकडाऊन बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली.

अन्यथा व्यापाऱ्या सोबत रस्त्यावर आंदोलन करावे लागेल अशी भुमिका मांडली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भावना शासनाला कळवतो असे सांगितले. यावेळी जगदीश पटवारी, प्रदीप कुमार संचेती ,सुनील सराफ, नगरसेवक मनिष भोसले, जगदीश खीलोशिया, अनुराग भारतीया, राजेश संचेती, निहाल बागवान, किशोर सेठ संचेती,मुर्तुजा शार्मील , हुजैफा बोहरी,मनीष बागाई, संदीप देवरे, योगेश सोनार, अमोल घाडगे, कन्हैया परसवाणी, अनुप अग्रवाल, विनोद ललवाणी,जयरामदास रिझ्झुमल,गुलाब पंजवाणी, युवा मोर्चा अध्यक्ष समाधान मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप आमदारासह इतरांनी ‘सामूहिक मुंडन’ करीत तिघाडी सरकारचं ‘तेरावं ‘ घातलं…

Next Post

‘या’ देशात अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नाही…

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

'या' देशात अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नाही...

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us