मुंबई, (प्रतिनिधी)- भाजपचे मीडिया सेल प्रमुख नविनकुमार जिंदाल यांनी दोन तीन दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांच्या आजार पणाबाबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं त्यावर राष्ट्रवादी ncp चांगलीच भडकली असून असलां प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल naveenkumar jindal यांनी शरद पवारांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणे दुर्दैवी आहे आणि आम्हाला सहन होण्यासारखे नाही. नवीन कुमार यांच्या वक्तव्याबद्दल भाजपने दोन दिवसांत माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हटलं होतं नवीन जिंदाल यांनी…
सचिन वाझे sachin vaze यांनी एनआयए समोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ काला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट नवीन कुमार यांनी केलं होतं.