सांगली – भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना काढलेल्या सेल्फीत हसून दाद दिल्याने टीकेचे लक्ष झाले आहेत. दरम्यान यानंतर गिरीश महाजन यांनी माहिती देत आपण प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन बचावकार्यात सहभाग घेतल्याची माहिती दिली आहे. बचावकार्यात सहभागी झाल्याचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन एनडीआरएफ जवानांसोबत पाण्यात उतरुन लोकांना बाहेर काढण्याचं काम करत असल्याचे दिसत आहे.
सांगलीमधील ज्या पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं, त्याठिकाणी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत व सांगलीचे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्यासोबत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोलेले आहेत आणि त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.