जळगाव/एरोंडल,(प्रतिनिधी)- बायोडिझेलच्या नावाखाली अवैध इंधनविक्री करणाऱ्या पंपाची व ठिकाणाची तपासणी करुन दोन दिवसात कारवाई करणार असल्याचं एरोंडल प्रांतधिकारी श्री. गोसावी यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.
बायोडिझेल पंपांनी जिल्हा प्रशासनाची कुठलीही परवानगी तर घेतलेली नाही असा स्पष्ट खुलासा जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ‘नजरकैद’ बोलतांना यापूर्वीच केला आहे.याप्रकरणी एरोंडल – पारोळा मतदार संघांचे आमदार चिमणआबा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वी केलेली आहे तरी देखील कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिले सर्व प्रांतधिकाऱ्यां यापूर्वीच पत्र
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यापूर्वीच दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी सर्व उपविभागीय दांडाधिकारी यांना पत्र काढून जिल्ह्यातील विना परवानगीने सुरु असलेल्या बायोडिझेल पंपाची तपासणी होऊन त्यावर कारवाई करणेबाबत सूचित करण्यात आले होते. तसा अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश दिले होते.तरी देखील जिल्हात बायोडिझेल पंप सऱ्हासपणे सुरु आहेत.
बायोडिझेलच्या नावाखाली इंधनाच्या काळ्या बाजाराने जळगाव जिल्ह्यात बस्तान बसवले आहे. जिल्ह्यात हायवे, तसेच आडमार्गाला बायोडिझेल पंप आहेत. विशेष म्हणजे या पंपावर नेमके कोणते इंधन विकले जाते, याची माहितीच नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणांहून येथे माल येतो. तो नेमका कुठून येतो, याचे अधिकृत रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कारवाई होऊ नये म्हणून वेगवेगळ्या शक्कल लढवली जात आहे.वेळेतच कारवाई करणे आवश्यक आहे.















