Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘ गुलियन-बार्रे सिंड्रोम’ या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

najarkaid by najarkaid
January 20, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘ गुलियन-बार्रे सिंड्रोम’ या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या आठ वर्षांपूर्वी रोहित बडगुजर या मुलाला गुलियन-बार्रे सिंड्रोम हा आजार झाला होता. यामुळे मानेखालील संपूर्ण शरीराला लकवा झाला होता. परिणामी शरीराची हालचाल बंद झाली. श्वसनाला मदत व्हावी म्हणून मानेत छेद देत कुत्रिम रस्ता बनवत ट्रेकेओस्टॉमी ट्यूब टाकण्यात आली. यामुळे श्वसन प्रक्रिया सुरु आहे. तसेच पोटात एक नळी टाकून पाणी स्वरूपात जेवण दिले जाते. ट्रेकेओस्टॉमी हि जुनी झाली असल्याने ती स्वच्छ करताना तुटून ट्यूबचा तुकडा श्वास नलिकेत खोलवर जाऊन उजव्या फुफुसाच्या मार्गामध्ये अडकला. परिणामी रुग्णाला श्वासोच्छवासाला त्रास झाला. दरम्यान भुसावळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये श्वसनासाठी नळी टाकून रुग्णाला स्थिर करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले. रुग्णाला धाप लागत असल्याने सर्वप्रथम रुग्णाचा एक्सरे काढण्यात आला, त्यांनतर डॉक्टरांनी उपचारासाठी लागणार्‍या साहित्यांची जमवाजमव करत रिजिड ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया करत अडकलेला तुकडा यशस्वीरीत्या काढला. रुग्णाच्या शरीरातून फॉरेन बॉडी काढल्यानांतर नवीन ट्रेकेओस्टॉमी ट्यूब लावण्यात आली. यानंतर एक दिवस रुग्णाला ऍडमिट ठेवले असून पुढील दिवशी रुग्णाची प्रकृती नीट झाल्याने सुट्टी देण्यात आली.या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ.मिलिंद जोशी, डॉ.पंकज चौधरी, डॉ. जोशी, डॉ. वरून देव, इ एन. टी. तज्ञ् डॉ.विक्रांत वझे, डॉ. हर्षल, डॉ. श्रृती यांच्यासह भूलतज्ञ डॉ. ऋतुराज काकड, डॉ. सागर व्यास, डॉ. शीतल, डॉ. हर्षा, डॉ. प्राजक्ता, डॉ. शिवाजी यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्जरी आयसीयू मध्ये सुषमा तायडे, शोले पटेल, पूजा गांजरे, धनश्री कंबे, डॉ. शशांक पवार यांनी रुग्णाची देखभाल केली.
टिमवर्क महत्वाचे – डॉ. विक्रांत वझे डॉ. मिलींद जोशी
फॉरेन बॉडी रुग्णाच्या शरीरातून इमरजन्सी काढण्याच्या केसेसमध्ये सर्जन कितीही अनुभवी असला तरी प्रत्येक केस ही नवीन असते. “ एअर वे रिलेटेड” अर्थातच श्वसन व्यवस्थेशी संबंधित शस्त्रक्रिया या कायमच भुलतज्ञांच्या टिमसोबत केल्याने यशस्वी ठरतात. भुलतज्ञांचे भुल देण्यासाठी आणि श्वसन नियंत्रीत ठेवण्याच्या कामात मोलाचा सहभाग असल्याचे डॉ. विक्रांत वझे व डॉ. मिलींद जोशी यांनी सांगीतले.
पोटाला चिमटा देवून करतोय उपचार
२०१२ मध्ये रोहितला अचानक शरीरात ताकतच नसल्याचे जाणवले आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. जळगाव येथील खाजगी हॉस्पितळात नेले असता जीबीएस हा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनतर मुंबई, पुणे येथीलही दवाखान्यात त्याचे उपचार केले मात्र आजार पूर्ण बारा झाला नाही. आता पुन्हा रोहितला धाप लागू लागल्याने आम्ही भुसावळ येथील दवाखान्यात दाखवले त्यांनतर डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात आलो, यावेळी रोहितची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली आणि श्वासनलिकेत अडकलेला ट्यूबचा तुकडा काढत माझ्या मुलाला पुन्हा नॉर्मल श्वास घेता येत आहे. २०१२ पासून ते आता पर्यंत १२ ते १४ लाख रुपये दवाखण्याचा खर्च झाला. काल वेळेवर माझ्या मुलाला उपचार मिळाले त्यामुळे त्याला आजचा दिवस पाहता आला. वडा-पाव चा माझा व्यवसाय आहे, हात मजुरीवर संसाराचा गाडा ओढणे सुरु आहे. रोहित हा हुशार मुलगा आहे ७ वी पर्यंत त्याने पहिला क्रमांक चुकविला नसल्याचेही रोहित चे वडील संजय बडगुजर यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कांताई नेत्रालयात १५ हजारावर शस्त्रक्रिया ; पाचवा वर्धापदिन उत्साहात साजरा

Next Post

नवीन कायद्यामुळे मिळाला बांधकाम क्षेत्रात दिलासा : प्रकाश भुक्ते

Related Posts

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
नवीन कायद्यामुळे मिळाला बांधकाम क्षेत्रात दिलासा : प्रकाश भुक्ते

नवीन कायद्यामुळे मिळाला बांधकाम क्षेत्रात दिलासा : प्रकाश भुक्ते

ताज्या बातम्या

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us