रावेर/प्रतिनिधी:-दि.8 – म.रा.पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणीच्या जळगाव जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी रावेर येथील पत्रकार विनोद रामचंद्र कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर येथील दै.नजरकैद चे ता.प्रतिनिधी विनोद रामचंद्र कोळी यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे पत्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा हे रावेर येथे आले असता त्यांनी दि.८ जानेवारी रोजी दिले.
या निवडीबद्दल रावेर ता.अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश चौधरी,ता.संघटक प्रदीप महाराज,ता.सहसंघटक विनायक जहुरे, सदस्य सरदार पिंजारी, हमीद तडवी,मनीष चव्हाण, आनंदा भालेराव,संकेत पाटील, परिसरातील सर्व पत्रकार बंधू व पदाधिकारी तसेच मित्रपरिवारा नी अभिनंदन केले आहे.