जळगाव: सेवनिवृत्तीपर्यंत अखंड विद्यादान करून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविणाऱ्या प्रा.डॉ.राधिका सोमवंशी आणि प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी यांनी मंगळवारी,5 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी आपले सामाजिक योगदान म्हणून एक लाख एकशे अकरा रुपयांचा धनादेश ‘ योजक ‘ चे संयोजक भगवतीप्रसादजी मुंधडा , निधीप्रमुख आणि माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रजी लढ्ढा, लघुउद्योग भारतीचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोरजी ढाके आणि राहुल तोडा यांना सुपूर्द केला.5 जानेवारी हा प्रा.डॉ.राधिका यांचा वाढदिवस होता.हा सुयोगही यात साधण्यात आला होता.
प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी हे एम.जे.कॉलेजमधून निवृत्त झाले असून सध्या ते विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत.विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये ते तज्ज्ञ संचालक असून एसडी सीड मध्येही त्यांचे योगदान आहे. तसेच गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणाऱ्या अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एक्सलन्ससाठीही ते काम करतात. तसेच सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या विद्यार्थी सहाय्यक समितीवरही ते आहेत.
प्रा.डॉ.राधिका सोमवंशी या नूतन मराठा कॉलेजमधून स्टॅटिस्टिक आणि मॅथेमॅटिक्स विभागातून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत.त्या सातत्याने गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करून त्यांना ध्येयपूर्तीसाठी प्रोत्साहन देत असतात.
या दाम्पत्याच्या दोन्ही मुली डॉक्टर असून त्या अनुक्रमे लंडन आणि बंगलोर येथे रुग्णसेवा करीत आहेत.
या दाम्पत्याच्या दोन्ही मुली डॉक्टर असून त्या अनुक्रमे लंडन आणि बंगलोर येथे रुग्णसेवा करीत आहेत.
हा धनादेश प्रदान करताना प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी, प्रा.डॉ.राधिका सोमवंशी यांच्यासोबतच धीरज चव्हाण, डॉ.प्रियंका चव्हाण, निमित चव्हाण आणि शांताराम भागवत (अहमदाबाद ) हेही उपस्थित होते.
















