Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी

najarkaid live by najarkaid live
January 3, 2021
in जळगाव
0
सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य- ॲड.अनुराधा वाणी
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांनी आत्मसन्मानासाठी जागृत राहिले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य असून त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून प्रत्येक महिलांनी त्यांच्या क्षेत्रात भरारी घेवून यश मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. अनुराधा वाणी यांनी केले.

येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा रविवारी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिला शिक्षण दिनानिमित्त सत्कार आयोजित केला होता. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ॲड. अनुराधा वाणी,जळगाव जनता बँकेच्या संचालिका आरती हुजुरबाजार, सावित्री सोळुंके , युवराज माळी, प्रकाश शिरसाठ, पर्यावरण प्रेमी नाना पाटील उपस्थित होते. प्रस्तावनेत विजय लुल्हे यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत महिलांच्या कार्याचा गौरव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यानंतर समानार्थी सर्व महिलांचा व त्यांच्या कार्याचा परिचय विश्वजीत चौधरी यांनी करून दिला.

यावेळी ॲड. अनुराधा वाणी म्हणाल्या की, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हे खूप मोठे महत्त्वाचे कार्य आहे. महिलांना आजही दुय्यम वागणूक तिला सामोरे जावे लागते असे सांगून त्यांनी “मी सावित्री बोलतेय” एकपात्री नाटिका सादर केली. यावेळी वाढदिवसानिमित्त आदर्श माता सिंधू सुपडू सुतार यांना मान्यवरांनी गौरविले.

कार्यक्रमात एकूण १८ महिलांना गौरविण्यात आले. यामध्ये अरुणा उदावंत, प्रणाली सिसोदिया, धनश्री बागुल, नाजनीन शेख, यशोदा कणसे, मंगला बारी, सरिता नेरकर, अधिसेविका कविता नेतकर, दिव्यांग मीनाक्षी निकम, छाया पाटील, हर्षाली पाटील, स्वाती भावसार, वर्षा अहिरराव, सुष्मिता भालेराव, मनीषा मेथाळकर, वैशाली विसपुते, प्रभावती बावस्कर, संगीता माळी यांना शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सन्मानार्थीतर्फे अरुणा उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन छाया पवारपाटील यांनी तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे, आर. एस.चौधरी, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा.दिलीप भारंबे, प्रा.आर.ए.पाटील, पर्यावरण प्रेमी सुरेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार दीपक महाले, वर्धिष्णू संस्थेचे अद्वैत दंडवते, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, जिंदगी फाउंडेशनचे अजय पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी निर्मिती लुल्हे, सुवर्णा लुल्हे, समीक्षा लुल्हे, सुपडू सुतार, मीनाक्षी चौधरी, राहुल सोळुंके, सुनील दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

*समीक्षा विजय लुल्हे हीचे आदर्श सामाजिक उत्तरदायित्व*
सन २०२० मध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ९९ .८० % गुण प्राप्त करून खानदेश मधून पहिली आलेली समीक्षा विजय लुल्हे हीने कचरा वेचक व बालमजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण देणाऱ्या आनंदघर साठी मिळालेल्या बक्षिसाची एकूण रक्कम २१०० रुपयांची देणगी रोखीने प्रणाली सिसोदिया ( वर्धिष्णू सोशल रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट सोसायटी) यांना सुपूर्द केली . समिक्षेच्या संवेदनशील सामाजिक दायित्वाचे अद्वैत दंडवते यांनी कौतुक केले . तसेच प्रकाश शिरसाठ (पहूर ) यांनीही आनंद घरसाठी देणगी दिली .याप्रसंगी समीक्षाची ज्येष्ठ भगिनी सुवर्णा लुल्हे,आजोबा सुपडू सुतार (निवृत्त मुख्याध्यापक) ,वडील प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गो से हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे

कर्मचारी न्याय करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक- परमेश्वर माटे

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us