गौरवकुमार पाटील / अमळनेर- तालुक्यातील मारवड येथे पोलीस ठाणे असून जवळच सेंट्रल बँकेची शाखा आहे त्याच्या शेजारीच कल्याण- मिलन नावाचा सट्टा जुगार खेळविला जात असल्याची गुप्त माहिती अमळनेर विभागाचे डीवायएसपी राकेश जाधव यांना मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष पथकाने काल दिनांक २९ रोजी सायंकाळी छापा टाकून दोन आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ पकडून अटक केल्याने मारवड पोलीस ठाण्याच्या समोरच डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा होत आहे.
अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना एका खबऱ्या मार्फत मारवड सेंट्रल बँक शाखे शेजारीच सार्वजनिक ठिकाणी सट्टा खेळविला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आपल्याच कार्यालयातील पोलीस नाईक विलास गायकवाड ,पंकज पाटील , धनंजय पाटील ,कैलास साळुंखे या पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून खात्री करून कारवाईसाठी पाठविले असता सेंट्रल बँकेच्या मागिल बाजूस लागूनच असलेल्या माळण नदी काठी पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी दोन इसम कार्बन , आकडे लिहिण्याचे साधनसामग्रीसह कल्याण मिलन नावाचा मटका सट्टा खेळताना व खेळविताना रंगेहाथ मिळून आल्यावर त्यांचे नाव सुनील जगदाळे व शिवदास पारधी असे पोलिसांना सांगितले त्यांच्या कब्जातील ५ हजार ६०० रुपये रोख व इतर साहित्य जप्त करून रंगेहाथ अटक करून पोलीस नाईक विलास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात सुनील दिलिप जगदाळे वय ३६ व शिवदास बाबुराव पारधी दोन्ही राहणार मारवड ता अमळनेर यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत, यात मारवड पोलीस ठाण्याच्या समोरच अमळनेर येथून डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा होत आहे.