जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर काल प्रफुल्ल लोढा यांनी बिनबुडाचे आरोप केले असून या विषयी कायदेशीर बाब तपासून कारवाई करू प्रफुल्ल लोढा पक्षाचा सभासद देखील नाही त्यांनी केलेल्या आरोपांचा राष्ट्रवादी पक्ष निषेध करत असल्याचं राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया यांनी आज दि.26 रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्याने नवं चैतन्य निर्माण झालं आहे. पक्षात प्रवेश केल्यानं नाथाभाऊ यांना इडीची नोटीस देण्यात आली आहे. त्याच कायदेशीर उत्तर नाथाभाऊ नक्की देतील असंही ते यावेळी बोलत होते.यावेळी लाडवंजारी, अजय बढे आदी उपस्थित होते.