पाळधी, ता. धरणगाव, (प्रतिनिधी)- येथील इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोरोना व लॉकडाऊन या कालावधीत शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना शिक्षण प्रवाहात सहभागी करण्यासाठी शाळे मध्ये प्रत्येक महिन्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. नोव्हेंबर महिन्यात वर्ग नर्सरी ते 2 री फॅन्सी ड्रेस व वर्ग 3 री ते 10 वी निबंध स्पर्धा या मासिक स्पर्धांच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या वर्ग नर्सरी ते 10 वी या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन इंजिनिअर नरेश पी. चौधरी सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शाळेचे प्राचार्य महेश कवडे, उपस्थित समन्वयक गजानन पाटील उपस्थित होते.