Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

तपासणीच्या नावाखाली जामनेरात भामट्यांचा डल्ला मारण्याचा इरादा फेल ; पत्रकार प्रदीप गायके यांच्या जागरूकतेमुळे झाला भांडाफोड ; जामनेर येथील राका फर्निचर यांच्या घरी थरारक घटना

najarkaid by najarkaid
December 8, 2020
in जळगाव
0
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी) – जामनेर येथील प्रतिष्ठित व्यापारी पवन राका यांच्या राका फर्निचर्स या दुकानात तपासणीच्या बहाण्याने आलेल्या भामट्यांना पत्रकाराच्या जागृतीमुळे काढता पाय घ्यावा लागला.अतिशय सफेद पोश एक महिला आणि सात तरुणांनी डल्ला मारण्याचा डाव पत्रकार प्रदीप गायके यांनी हाणून पाडला असून सुमारे पाच तास चाललेल्या या नाट्याला वेगळेच वळण मिळाले.

जामनेर येथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यापारी पवन राका यांचे भव्य दिव्य असे राका फर्निचर नावाचे शोरूम पाचोरा रोडवर आहे. दिनांक 7 रोजी या शोरूमवर इन्कम टॅक्सची अधिकारी असल्याचा बहाणा करून सात भामट्यांनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तपासणी आणि धाड बनावट निघाली असून भामटे पसार झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा रोडवर श्री पवन राका यांचे राका फर्निचर नावाचे भव्यदिव्य असे शोरूम आहे. सोमवारी त्यांच्या दुकानात आणि घरी एकाच वेळेला इन्कम टॅक्स किंवा जीएसटीचे अधिकारी असल्याचे भासवून पवन राका यांना खरेदी-विक्रीचे कागदपत्रे, जीएसटी च्या पावत्या, बिल बुक, रोकडा रक्कम यांची तपासणी करण्यासाठी पाचारण केले .पवन राका आकस्मिक आलेल्या या लोकांच्या पथका मुळे धास्तावले .पवन राका यांचे कुटुंबीय , त्यांचे मोबाईल , कुटुंबामधील कामवाली महिला या सगळ्यांना या भामट्यांनी बंदिस्त करून ठेवले .त्यांचे मोबाईल सुद्धा जमा केले .सुमारे पाच तास बाहेर कोणाचीही संपर्क होऊ दिला नाही.
दरम्यान जामनेर येथील वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक पुण्यप्रतापचे आवृत्ती प्रमुख प्रदीप गायके यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी पाचोरा रोडवर श्री ललवाणी यांच्याकडे गेले. त्यावेळेला आयकर विभागाची धाड पडल्याचे ललवाणी यांनी प्रदीप गायके यांना सांगितले. प्रदीप गायके यांनी ताबडतोब पवन राका यांच्या राका फर्निचर मध्ये प्रवेश केला. त्यावेळेला प्रदीप गायके यांना संबंधित भामट्यांनी अक्षरशहा आत मध्ये डांबून ठेवले. त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला .मात्र बाका प्रसंग आहे हे लक्षात घेऊन पत्रकार प्रदीप गायके त्याठिकाणी शांत राहिले. प्रदीप गायके यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांना बाहेर संपर्क करू दिला नाही .सुमारे चार तास राका परिवारांच्या सोबत पत्रकार प्रदीप गायके यांनाही बंदिवान बनविले. आयकर विभागाचे आम्ही अधिकारी आहोत. बाहेर काहीही बोलायचे नाही .संपर्क करायचा नाही .अशा प्रकारची धमकी दिली चार तास तपासणी चालली. पत्रकार प्रदीप गायके या वेळात काहीही बोलले नाही. सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पहात होते.
सायंकाळच्या सुमारास तपासणी पूर्ण झाल्याचा बहाणा करून या या नकली आयकर पथकाने जामनेरातून काढता पाय घेतला. पत्रकार प्रदीप गायके यांना त्यांच्या आलिशान गाडीमध्ये बसून पुढे टाकळी गावाजवळ उतरून दिले .
जामनेर शहरात फिल्मी स्टाईल आयकर विभागाची धाड पडली. मात्र ही धाड पूर्णपणे बनावट आणि नकली निघाली. कोणतीही पोच किंवा पावती पवन राका यांना दिली नाही किंवा या पथकातील कोणाही व्यक्तीने एकही कागद किंवा फाईल सोबत नेले नाही. दिवसाढवळ्या पैसा आणि सोने-चांदी लुटीच्या बहाण्याने ही टोळधाड पवन राका यांच्या दुकानात पडली. मात्र पुढे काहीही निष्पन्न झाले नाही .
ज्या वेळेला जामनेरात पवन राका यांच्या शोरूम मध्ये आयकर विभागाची धाड पडली त्यावेळेला पवन राका घराजवळ असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये होते .पवन राका यांना घरच्या मंडळींनी बोलावून घेतले आणि आयकर विभागाचे अधिकारी घरी आल्याचे सांगितले .पवन राका घरी आल्यावर त्यांनी सगळी कागदपत्रे संबंधित अधिकारी यांना दाखवली, मात्र या अधिकाऱ्यांनी काहीही माहिती सांगितले नाही .कोण आहेत? कुठून आले ? हे सुद्धा सांगितले नाही .त्यांचे परिचय पत्र सुद्धा दाखवले नाही. जेवढा वेळ राका फर्निचरची तपासणी सुरु होती एवढा वेळ पत्रकार प्रदीप गायके हे या नकली आयकर अधिकाऱ्यांचे बंदिवान झाले होते.
फिल्मी स्टाईल आयकर धाडीने राका आणि गायके धास्तावले होते .बाहेर सगळ्यांना आत काय सुरू आहे याची काहीच कल्पना नव्हती .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं चंद्रकांत पाटील यांना वाटतंय…

Next Post

पुरंदर प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगतीनं व्हावं म्हणून शरद पवारांनी घेतली राजनाथसिंग यांची भेट

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
पुरंदर प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगतीनं व्हावं म्हणून शरद पवारांनी घेतली राजनाथसिंग यांची भेट

पुरंदर प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगतीनं व्हावं म्हणून शरद पवारांनी घेतली राजनाथसिंग यांची भेट

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us