मुंबई, – ‘‘Trading pawer” पुस्तकात शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवल्याचं अचूक वर्णन केलं असल्याचं माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांतील बेईमानीची गाथा सांगणारे श्रीमती प्रियम मोदी यांचे “Trading Power” हे पुस्तक वाचले. शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवून केलेल्या विश्वासघाताचे अचूक वर्णन या पुस्तकामध्ये आहे. श्रीमती मोदी यांना उज्वल साहित्यिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा…
काय आहे ‘trading pawer’ पुस्तकात
महाराष्ट्र राज्यातील 2019 च्या निवडणुका व सत्ता स्थापण्यासाठी जे जे घडले ते सर्व जनतेच्या समोर आलं नसल्याने अशा अनेक गोष्टींचा उलगडा या पुस्तकात लेखिका प्रियं मोदी यांनी केला असल्याने ‘trading pawer’ हे पुस्तकं चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देण्यासाठी होते याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे तर पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीची स्टोरी बातमी सविस्तर वृत्तांत दिला आहे.
‘trading pawer’ हे पुस्तकं लेखिका प्रियं मोदी यांनी भाजपा नेते नारायण राणे यांना भेट दिल्यानंतर राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

















