जळगाव /जामनेर, (प्रतिनिधी) – गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी महिलेला वाहनातुन थेट रुग्णालयाच्या गेट वर सोडून मदत करणाऱ्या गस्तीवर असणार्या पोलिसांचे कौतुक करणारं ट्विट राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून नुकतेच केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत केलेल्या मदतीने खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले. “गृहमंत्री यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, जळगाव पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी मध्यरात्री २:४५ वा. एका गर्भवती महिलेला तिच्या नातेवाईकांसह गस्तीच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचविले. संवेदनशील जळगाव पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यतत्परतेने केलेली ही मदत कौतुकास्पद आहे.” यावेळी त्यांनी याबाबत आलेल्या प्रकाशित झालेल्या बातमी वृत्तपत्र कात्रणाचा फोटो देखील शेअर केला आहे.
नेमकी काय केली पोलिसांनी मदत…
जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील रहिवाशी असलेल्या महिला रुग्णालयात दाखल होण्यासाठी खाजगी वाहनाने जामनेर आली असता खाजगी वाहन चालकाने तिला रुग्णालयात न पोहोचविता मध्यरात्री नगरपालिका चौकात उतरवून दिले. याच वेळी गस्तीवर असणारे पोलिसांचे वाहन त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर हवालदार रमेश कुमावत यांनी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याशि बोलून महिलेस एका खाजगी रुग्णालयात दाखल करून मदत केली. यावेळी श्याम खाडे, प्रदीप पोळ, गोपाल बुळे, ईश्वर चौधरी व भैया माने यांनी सहकार्य केले. यामुळे खाकीतील माणुसकीचे दर्शन पाहिला मिळाले असल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलातील जामनेर पोलीस कर्मचारी यांचे कौतुक करणार ट्वीट केलं आहे.