पाचोरा(प्रतिनिधी) – पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी आज ठीक एक वाजता पाचोरा पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला असून येणाऱ्या काळात गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून काम करणार असून यापुढे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात फडकू नये असा संदेश नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी ‘नजरकैद’शी बोलताना दिला.
बोलताना पुढे नजन पाटील म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असून तालुक्यात गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील कुणाची हय गय होणार नाही. तर चांगल काम करणाऱ्यांच्या पाठीशी देखील उभे राहू असेही ते यावेळी म्हणाले.