दिल्ली, – १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सरकारने शहरांमध्ये वायु गुणवत्तेच्या उपाययोजना सुधारण्यासाठी राज्यांना पहिला हप्ता म्हणून २,२०० कोटी रुपये जाहीर केले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करुन दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेन्द्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, वायू गुणवत्तेच्या उपाययोजना सुधारण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या 2200 कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ₹ 396.5 कोटी प्राप्त झाले आहेत.औरंगाबाद:16 कोटी, बृहन्मुंबई: 244 कोटी, नागपूर: 33 कोटी, नाशिक:20.5 कोटी,
पुणे: 67 कोटी, वसई-विरार: 16 कोटी.