एरंडोल, दिनांक ३. – मौजे सारंखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील भूत बंगला परिसरातील वस्तीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून झोपेत असताना खून करणारा नराधम किशोर शिवदास वडर यास कठोर फाशीची शिक्षा व्हावी तसेच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील आदिवासी समाजाचा एकाच कुटुंबातील चार भावंडांचा झालेला निर्घुण खून या प्रकरणाचा तपास लागावा त्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येऊन पीडित कुटुंबीयांना दिलासा द्यावा व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरले असून एरंडोल तालुका प्रांताधिकारी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना प्रत्यक्ष त्यांच्या दालनात जाऊन एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी भाऊ सोनवणे एरंडोल तालुकाध्यक्ष सुक्राम ठाकरे तालुका सचिव वाल्मीक सोनवणे शहराध्यक्ष पिंटू सोनवणे रवींद्र भील , विनोद आदिवासी वस्ती,उपशहर अध्यक्ष विनोद मालचे पारोळा तालुका उपाध्यक्ष किशोर वाघ सुनील पवार राहुल सोनवणे टायगर फोर्स एरंडोल नगरपालिका मोरे अरुण मोरे सुभाष भील सुनील आप्पा भील , सुरेश भील आदींच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले . एरंडोल शहरातील रस्त्यावरून शांततेच्या मार्गाने निघालेल्या या आदिवासी समाज बांधवांच्या शिष्टमंडळरुपी निवेदन शिष्टमंडळात दिनांक २ रोजी दुपारीआदिवासी माता-भगिनी युवक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच समविचारी संघटनांचा पाठिंबा होता समावेश होता. याप्रसंगी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब जिल्हाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ यांनी प्रतिनिधींशी संवाद साधून आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली.तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या दालनात निवडक प्रतिनिधी माता भगिनी व पदाधिकाऱ्यांची निवेदन स्वीकारले. व आपल्या भावना शासनाला कळवू असे सांगितले. याप्रसंगी आदिवासी समाज बांधवांनी आवारात काही वेळ ठिय्या केला.