- दिलीप वाघ यांनी विकास कामांविषयी निराधार आरोप करण्यापेक्षा आमदाराचे कार्यक्षेत्र समजून घ्यावे
- विकासाच्या जोरावर अजुन पस्तीस वर्षे मला कुणीही हलवू शकत नाही
- रस्ता कॉंक्रिटीकरण बाबत जिल्हाधिकार्यांचा आदेश चुकीचा असल्याची माहिती
- आ. किशोर पाटील यांचा खुलासा
पाचोरा:- साडेचार वर्षात पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचा चौफेर विकास केला असून त्या आधारावरच मी जनतेसमोर जात आहे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात विकासाचे भरीव कार्य केल्याने मी सुरू केलेल्या आशीर्वाद यात्रेचे सर्वत्र स्वागत होत आहे यामुळे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच विकास कामांविषयी निराधार आरोप केले जात असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवतीर्थ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पाचोरा शहरातील रस्ता काँक्रीट काम निकृष्ट असल्याची तक्रार नगरसेवकांच्या निवेदनासह दिलीप वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्याबाबत त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सदरचे काम आणि ठेकेदार विषयी गंभीर आरोप केले होते.याबाबत उत्तर देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते प्रसंगी सेनेचे जिल्हा उपप्रमुख दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय वाघ, उपनगराध्यक्ष शरद पाटील, उद्योजक मुकुंद बिल्डीकर, गणेश पाटील, नगरसेवक सतीश चेडे, वाल्मीक पाटील, जि.प. सदस्य पदमसिंह पाटील राजेश पाटील आदी उपस्थित होते.पाचोरा- भडगाव विधानसभा क्षेत्रा चा आमदार होऊन काम करत असताना मागील साडेचार वर्षात 595 कोटी रुपयांचे कामे फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत पूर्ण करून एक हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्धार व्यक्त केला होता विकास कामांविषयी प्रामाणिक प्रयत्न व पाठपुरावा करत असल्यामुळे विकास कामांच्या निधीचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत 595 ऐवजी 700 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.पाचोरा- भडगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची 200 कोटी रुपये खर्चाची योजना तसेच पाचोरा भडगाव येथे प्रत्येकी 15 कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी आणि खेडगाव विद्युत उपकेंद्र तसेच एमआयडीसी प्रकल्प मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याने माझ्या विकासकामांचा आकडा हा हजार कोटी रुपयांच्या वरती जाणार आहे त्यामुळे दिलीप वाघ यांनी विकासकामांची आकडेवारी मधून घरी फक्त आराम करावा या शिवाय दुसरे काही करू शकणार नाही असा उपरोधिक टोला आमदार पाटील यांनी यावेळी लगावला. काँक्रीट कामाला विषयी केलेल्या आरोपाबाबत बोलताना सदरचे काम अजून पूर्ण झालेले नसताना त्याविषयी दिलीप वाघ यांनी केलेली तक्रार निरर्थक असून याबाबतच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी काम थांबवले विषयी दिलेला आदेश चुकीचा असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. या कामाच्या ठेकेदाराबाबत शेटजी भटजी अशा शेलक्या भाषेत टीका करणारे दिलीप वाघ जातीवादी भाषा बोलत असून विकास कामांचा झंजावात पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते निराशेतून आरोप करत असल्याचे आमदार पाटील म्हणाले.आमदाराची कार्यक्षेत्र केवळ आमदार निधी पुरते मर्यादित राहत नसून मतदारसंघात विविध शासकीय विभागामार्फत होणाऱ्या विकास कामांच्या योजनांचा अध्यक्ष आमदार असतात त्यात या विभागासाठी आवश्यक त्या निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करणे शासनाकडून निधी मिळवून विकास कामे पूर्ण करणे ही आमदारांची कर्तव्य असतात त्यानुसार मी भरीव विकासकार्य केले असून माजी आमदार दिलीप भागांना हे सर्व अजून समजून घ्यावे लागेल असा टोला आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून त्यांच्यात रंगलेले वाग्युद्ध नागरिकात चर्चेचा विषय ठरत आहे. एरवी सर्व ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारे तालुक्यातील दोघे दिग्गज नेते एकमेकांवर टीका करत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. राजकीय स्वामित्वाचा लढाईतील शह-काटशह यानंतर सुरूच राहणार असून या लढाईत कुणाची सरशी होणार हा विषय औसतुक्याचा ठरणार आहे.विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेऊन सामोरे येत असताना त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिलीप वाघ कोण कोणते मुद्दे समोर घेऊन येतात याकडे लक्ष लागले आहे.















