Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलीप वाघ यांनी विकास कामांविषयी निराधार आरोप करू नये – आ. किशोरअप्पा पाटील

najarkaid by najarkaid
July 27, 2019
in जळगाव
0
दिलीप वाघ यांनी विकास कामांविषयी निराधार आरोप करू नये – आ. किशोरअप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • दिलीप वाघ यांनी विकास कामांविषयी निराधार आरोप करण्यापेक्षा आमदाराचे कार्यक्षेत्र समजून घ्यावे
  • विकासाच्या जोरावर अजुन पस्तीस वर्षे मला कुणीही हलवू शकत नाही
  • रस्ता कॉंक्रिटीकरण बाबत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश चुकीचा असल्याची माहिती
  • आ. किशोर पाटील यांचा खुलासा 

पाचोरा:- साडेचार वर्षात पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचा चौफेर विकास केला असून त्या आधारावरच मी जनतेसमोर जात आहे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात विकासाचे भरीव कार्य केल्याने मी सुरू केलेल्या आशीर्वाद यात्रेचे सर्वत्र स्वागत होत आहे यामुळे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच विकास कामांविषयी निराधार आरोप केले जात असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवतीर्थ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पाचोरा शहरातील रस्ता काँक्रीट काम निकृष्ट असल्याची तक्रार नगरसेवकांच्या निवेदनासह दिलीप वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्याबाबत त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सदरचे काम आणि ठेकेदार विषयी गंभीर आरोप केले होते.याबाबत उत्तर देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते प्रसंगी सेनेचे जिल्हा उपप्रमुख  दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय वाघ,  उपनगराध्यक्ष शरद पाटील,  उद्योजक मुकुंद बिल्डीकर, गणेश पाटील,  नगरसेवक सतीश चेडे,  वाल्मीक पाटील,  जि.प. सदस्य पदमसिंह पाटील राजेश पाटील आदी उपस्थित होते.पाचोरा- भडगाव विधानसभा क्षेत्रा चा आमदार होऊन काम करत असताना मागील साडेचार वर्षात 595 कोटी रुपयांचे कामे फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत पूर्ण करून एक हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्धार व्यक्त केला होता विकास कामांविषयी प्रामाणिक प्रयत्न व पाठपुरावा करत असल्यामुळे विकास कामांच्या निधीचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत 595 ऐवजी 700 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.पाचोरा- भडगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची 200 कोटी रुपये खर्चाची योजना तसेच पाचोरा भडगाव येथे प्रत्येकी 15 कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी आणि खेडगाव विद्युत उपकेंद्र तसेच एमआयडीसी प्रकल्प मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याने माझ्या विकासकामांचा आकडा हा हजार कोटी रुपयांच्या वरती जाणार आहे त्यामुळे दिलीप वाघ यांनी विकासकामांची आकडेवारी मधून घरी फक्त आराम करावा या शिवाय दुसरे काही करू शकणार नाही असा उपरोधिक टोला आमदार पाटील यांनी यावेळी लगावला. काँक्रीट कामाला विषयी केलेल्या आरोपाबाबत बोलताना सदरचे काम अजून पूर्ण झालेले नसताना त्याविषयी दिलीप वाघ यांनी केलेली तक्रार निरर्थक असून याबाबतच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी काम थांबवले विषयी दिलेला आदेश चुकीचा असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. या कामाच्या ठेकेदाराबाबत शेटजी भटजी अशा शेलक्या भाषेत टीका करणारे दिलीप वाघ जातीवादी भाषा बोलत असून विकास कामांचा झंजावात पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते निराशेतून आरोप करत असल्याचे आमदार पाटील म्हणाले.आमदाराची कार्यक्षेत्र केवळ आमदार निधी पुरते मर्यादित राहत नसून मतदारसंघात विविध शासकीय विभागामार्फत होणाऱ्या विकास कामांच्या योजनांचा अध्यक्ष आमदार असतात त्यात या विभागासाठी आवश्यक त्या निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करणे शासनाकडून निधी मिळवून विकास कामे पूर्ण करणे ही आमदारांची कर्तव्य असतात त्यानुसार मी भरीव विकासकार्य केले असून माजी आमदार दिलीप भागांना हे सर्व अजून समजून घ्यावे लागेल असा टोला आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून त्यांच्यात रंगलेले वाग्युद्ध नागरिकात चर्चेचा विषय ठरत आहे. एरवी सर्व ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारे तालुक्यातील दोघे दिग्गज नेते एकमेकांवर टीका करत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. राजकीय स्वामित्वाचा लढाईतील शह-काटशह यानंतर सुरूच राहणार असून या लढाईत कुणाची सरशी होणार हा विषय औसतुक्याचा ठरणार आहे.विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेऊन सामोरे येत असताना त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिलीप वाघ कोण कोणते मुद्दे समोर घेऊन येतात याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…त्या गाव गुंडांवर कारवाईचे पालकमंत्री ना.गिरीश महाजनांचे आश्वासन !

Next Post

आमदारांनी पाय जमिनीवर ठेवावे अहंकार दाखवू नये – माजी आ. दिलीप वाघ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
आमदारांनी पाय जमिनीवर ठेवावे अहंकार दाखवू नये – माजी आ. दिलीप वाघ

आमदारांनी पाय जमिनीवर ठेवावे अहंकार दाखवू नये - माजी आ. दिलीप वाघ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us