- …त्या गाव गुंडांवर कारवाईचे पालकमंत्री ना.गिरीश महाजनांचे आश्वासन
- नूतन मराठा महाविद्यालयाच्या कर्मचारी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची घेतली भेट
जळगाव – येथील नूतन मराठा महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षभरापासून गुंडगिरी करून दहशत माजविणारे विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष पाटील, व त्यांच्या गाव गुंडांवर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिले असून घाबरू नका…प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असे आज दिनांक 27 जुलै 2019 रोजी निवेदन देऊन भेट घ्यायला गेलेल्या नूतन मराठा कर्मचारी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

याबाबत सविस्तर असे की गेल्या वर्षभरात नूतन मराठा महाविद्यालय परिसरात प्राचार्य, कर्मचारी, सुरक्षारक्षक, यांच्यावर प्राणघातक हल्ले करून दहशत माजविणारे विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष पाटील व त्यांच्या गावगुंडांनी दहशत माजवली आहे अशा गुंडांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून निदर्शने, निवेदने देऊन विरोध नोंदवून न्याय मागण्यासाठी पुढे आले आहे. तरी देखील जिल्हापेठ पोलीस प्रशासन त्या गाव गुंडांवर कारवाई करीत नसल्याने कर्मचारी यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेऊन व्यथा मांडली आहे.
पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या भेटी प्रसंगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील, उपप्राचार्य संदीप गंगाराम पाटील यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.















