गौरवकुमार पाटील / अमळनेर –
येथून जवळच असलेल्या झाडी ते अमळनेर रस्त्यावर असलेल्या फार्म हाऊस शेजारी दिनांक २६ रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान कापूस वेचणी चालू असताना शेताचे रस्त्याच्या कडेला लावून शेतकरी हा शेतात मजुरांजवळ थांबलेला असताना मुख्य रस्त्यावर लावलेली होंडा शाईन कंपनीची एम १९ बिव्ही ७१२७ क्रमांक असलेली काळ्या रंगांची लाल पट्टे असलेली दिलीप धनगर पाटील यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याने त्या गाडीची शोधाशोध केली ती मिळून न आल्याने फिर्याद दिलीप पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.