गौरवकुमार पाटील / अमळनेर – येथून जवळच असलेल्या धार गावी महिलेचा घराजवळील अतिक्रमण काढण्याचा कारणावरून महिला व उपसरपंच यांच्यात वाद होऊन उपसरपंचाने लथाबुक्याने मारहाण करून महिलेचा साडीचा पदर ओढून लज्जास्पद कृत्य केल्याने उपसरपंचा वर मारवड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धार येथे काल दिनांक २४ रोजी सकाळी सुनंदा भगवान पाटील यांच्या घराशेजारील कोपऱ्यावर असलेल्या दगडांचे अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून उपसरपंच शशिकांत सखाराम पाटील व राजेंद्र माधवराव पाटील यांच्यात वाद होऊन दोन्ही इसमानी महिलेस शिवीगाळ करीत चापटा व लथाबुक्याने मारहाण करून उपसरपंच शशिकांत पाटील यांनी महिलेचा साडीचा पदर ओढून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने जावे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद पिफीत वय ५० महिलेने दिल्याने मारवड पोलिसांत उपसरपंच शशिकांत सखाराम पाटील व राजेंद्र माधवराव पाटील दोन्ही राहणार धार ता अमळनेर यांच्या विरुद्ध मारहाण करून विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विविध सहा कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव व एपीआय राहुल फुला यांनी भेट दिली