कर्जत/लोभेवाडी/ (मोतीराम पादिर) – रायगड जिल्हयात बहुतेक ठिकाणी आदिवासी समाज वास्थवे करतो बहुतेक आदिवासी समाज शेतीवर अवलबून आहे.जी जमिन कसत आहेत ती आजून परत आदिवासी शेतकऱ्याच्या नावे झालेली नाही.कसतआसलेल्या शेत जमिनीवर आपला हाक्क सांगता येत नाही.
रायगड जिल्ह्यात ब्रिटिश काळापासून आमचा आदिवासी समाज दळी जमिनी करत आहे. वन हाक्क कायदा २००६ अधिनियम २००८व सुधारीत आधिनियम२o१२ची योग्य अमलबजावणी न झाल्याने आतपर्यत त्यांच्या नावावर ७/१२ झालेला नाही. गेल्या पिढया न पिढया हा आदिवासी समाज कसत असलेल्या दळी जमिनी ह्या त्यांच्या नावावर झाल्या नाहीत परंतू पिढ्यान पिढया कसत असलेल्या दळी जमिन या जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात आहेत याची दखल घेण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संस्था रायगड जिल्हा आध्यक्ष मालू निरगुडे यांनी दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेल्या काहि दिवसात कोकणात आलेल्या चक्री वादळात आणि सध्या परतीच्या पावसात आदिवासी बांधवाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच लॉकडाऊन काळात आदिवासी कोणत्याही प्रकारचा रोजगार न मिळाल्याने आदिवासी समाजावर उपासमारिची वेळ आली आहे आता त्यामध्ये असून एक मोठा फटका या परतीच्या पाऊसाने कलेले नुकसान सर्व सामान्य आदिवासीला बसल्याने हा समाज आता पूर्ण हातबळ झाला आसून त्यांना ७/१२ची अट न लावता त्यांना झालेल्या शेतीचे नुकसानाची भरपाई सपूर्ण रायगड जिल्हयातील आदिवासीना मिळावी यासाठी आदिवासी ठाकूर समाज संस्था रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांनी आपल्या कार्यकर्तना घेऊन कर्जत तसिलदार
विक्रम देशमुख व प्रांत आधिकारी मॅडम वैशाली परदेशी यांना निवेदन देऊन आदिवासीच्या समस्या समोर मांडल्या तसिलदार साहेब यांनी आस्वसन देऊन कुठल्याच आदिवासीवर आन्याय होणार नाही व सर्व शेतकऱ्याच्या जमिनीचे लवकरात लवकर पंचनामे करून घेऊन त्यांना भरपाई मिळवून देऊ व दळीत जमिनी विषय चर्चा करून आपण शेतकऱ्यान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयन्त करू असे तसिलदार साहेब यांनी सांगितले. या वेळेस उपस्थित कार्यकर्त आदिवासी ठाकूर समाज संस्था रायगड जिल्हा आध्यक्ष मालू निरगुडे. कर्जत तालुका संघटना उपअध्यक्ष परशुराम दरवडा. संघटनेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय निरगुडा. संघटनेचे सचिव मोतीराम पादिर. संघटनेचे मा सचिव सुनिल पारधी. कविता निरगुडा आदिवासी समाज सेविका. गोमा निरगुडा सदस्य. गणेश पारधी विभागीय अध्यक्ष. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.