गौरवकुमार पाटील / अमळनेर – तालुक्यातील जैतपिर येथील २४ वर्षीय विवाहितेला खेतीया ता पानसेमल (मध्यप्रदेश) येथील सासरच्यांनी दोन महिने आनंदाने नांदवले मात्र पहिले मूळ घेऊन गेल्यावर पतीसाठी मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून तगादा लावून, दिवस गेल्यावर गर्भपात व्हावा म्हणून जेवणंही न देता अधिक श्रमाची कामे लावणे ,टोचून बोलणे असे संगनमताने सासू सासरे,मावस सासू ,मावस सासरे ,नणंद ,नंदोई यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देत गेले , याबाबत न्यायालयात खावटी साठी केसेसवर आल्यावर पोटात चाकू खुपसून महिलेला व वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली ,याबाबत महिला अन्याय अत्याचार समितीकडे तक्रार केली तरी ते येत नाहीत व पीडित महिलेला तीन वर्षांपासून मुलासह टाकून घेतल्याची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिल्याने खेतीया ता पानसेमल( मध्यप्रदेश) येथील पती ,सासू सासरे, दीर ,नणंद,मावस सासरे,सासू यांचे सह अक्कलकुवा येथील नंदोई अशा आठ जणांविरुद्ध काल दिनांक १५ रोजी सायंकाळी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ५० हजार रुपयांसाठी शारीरिक व मानसिक छळ करीत हुंडाबळी सह विविध चार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैतपिर ता अमळनेर येथील मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने खेतीया येथील कुटुंबातील विजय प्रकाश चौधरी या मुलाशी विवाह जुळल्याने २ एप्रिल १७ रोजी वडिलांनी सासरच्यांनी सांगितल्या प्रमाणे मोठ्या थाटात मानपान सह साखरपुडा केला व २३ एप्रिल रोजी खेतीया येथे पती व मुलीला ३० ग्रॅम सोन्याचे दागिने केल्यावर दोन महिने सुखरूप गुण्यागोविंदाने नंदविले त्यानंतर पहिले मूळ साठी माहेरी पाठविल्याने वडिलांनी सर्व संसारोपयोगी वस्तू घेऊन दिल्यावर पती सोबत सासरी पाठविले मात्र पतीसाठी मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून वरील आठही व्यक्तीनी तगादा लावला ते देण्याची वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने सासरी वेळोवेळी टोचून बोलून शारीरिक व मानसिक छळ केला गेला या दरम्यान पीडित महिला गर्भवती झाली तरी तिला जेवण न देता तिचा गर्भपात व्हावा म्हणून अधिक श्रमाने काम करायला भाग पाडले यामुळे तिची तब्येत बिघडल्याने माहेरी पाठविले त्यात तिने मूलाला जन्म दिल्याची माहिती सासरच्यांना दिली तरी त्यांनी नाँदवण्यासाठी नकार दिल्याने पीडित महिलेने महिला अन्याय अत्याचार समिती कडे धाव घेऊन न्यायालयात खावटी दावा दाखल केला यावेळी सासरच्यांनी महिला समितीकडे पाठ फिरवून न्यायालयात मात्र तारखेला उपस्थित राहिल्यावर मोटारसायकल खरेदीसाठी महेरून ५० हजार रुपये आणावेत नाहीतर वडील व पीडित महिलेला चाकूने मारून टाकू अशी धमकी दिली म्हणून अखेर पोलिसांत धाव घेतली व तशी फिर्याद दिल्याने मारवड पोलीस ठाण्यात खेतीया येथील सासरकडीत पती भूषण उर्फ विजय प्रकाश चौधरी ,सासरे प्रकाश हिरामण चौधरी ,सासु मीराबाई चौधरी,दीर लल्ला उर्फ अजय चौधरी ,नणंद सोनाली चौधरी,मावस सासरे धनराज चौधरी मावस सासू उषाबाई चौधरी हे सर्व राहणार खेतीया ता पानसेमल जिल्हा बडवानी ( मध्यप्रदेश ) व नंदोई सुनील चौधरी राहणार अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांनी संगनमताने मिळून वेळोवेळी ५० हजार रुपये हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून भादवी कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६ आशा विविध चार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राहुल फुला यांचे मार्गदर्शनाने हवालदार भास्कर चव्हाण व पोलीस नाईक सचिन निकम हे करीत आहेत