पाचोरा – जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा प्रथम स्मृती दिन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला या वेळी शाळेतील शिक्षीका प्रियंका बांठीया मॅडम यांनी महाराज साहब यांच्या कार्याबदद्ल माहीती सांगुन नवकार मंत्राचे उच्चारण केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुलकर्णी , सचिव श्री जीवनजी जैन ,स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवाणी हे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन सचिन करंदीकर सर यांनी केले. कार्यकमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते















